अक्षय तृतीये निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये महापूजा,प्रवचन,होणार.
अक्षय तृतीयानिमित शनिवारी ता. २२ रोजी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राजेश सरोदे, यतीन शहा, अजय भेगडे, हेमंत दाभाडे यांनी ही माहिती दिली. त्यामध्ये चंदन उटी, रूद्रयाग,भंडारा, महापूजा,अभिषेक, हरिपाठ, भजन, प्रवचन, महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच काळभैरवाष्टक पठण व दीपमाळ प्रज्ज्वलन होणार आहे. यतीराज महाराज लोहोर भागवताचार्य यांचे प्रवचन होणार आहे. तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.