अश्लिल रॅप साँगप्रकरणी शुभम जाधव या रॅपरवर गुन्हा दाखल
पुणे : परवानगी न घेतल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शूट केलेल्या कथीत अश्लिल रॅप साँगप्रकरणी शुभम जाधव या रॅपरवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संभाजी नगर चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय सहा वर्षांपासून बंद, नूतनीकरणावर मोठा खर्च.
शुभम जाधव यानं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “शिव्या देणं जर गुन्हा असेल तर भारतात गुन्हेगारांना गजाआड करायला पोलीस चौक्या कमी पडतील. आम्ही कलाकार आहोत, समाजाचा आरसा आहोत. आपलं प्रतिबिंब एवढं घाण आहे म्हणून समाजानं एवढं चिडायची गरज नाही. शिवी देणं हा गुन्हा होऊ शकत नाही. नामदेव ढसाळ, मन्टो, ग्रेस यांच्या कवितांमध्ये शिव्या आहेत”
पण आपलं गाणं अश्लिल नाही, उलट सकारात्मक विचार मांडणार आहे, असा दावा शुभमनं केला आहे. या गाण्यातून समाजाचं प्रतिबिंब दिसतं त्यामुळं समाजानं चिडायचं कारण नाही, असंही त्यांनं म्हटलं आहे.
माझं हे ‘सल्तनत’ नावाचं जे गाणं आहे हे वर्ल्डवाईड व्हायरलं झालं आहे. ते त्यातील व्हिज्युअल्स आणि म्युझिकमुळे. या व्हिडिओत मी एक चांगला सकारात्मक विचारही मांडला आहे, तो महाराष्ट्राला दिसला नाही त्यातल्या फक्त शिव्याच दिसल्या का? असा सवालही त्यानं विचारला आहे.
मी यासाठी रितसर परवानगी घेतली होती, फक्त ती लेखी न मिळता तोंडी मिळाली होती. त्यामुळे परवानगी घेतली नाही हा आरोप खोटा आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख झांबरे यांनी विद्यापीठात तसेच विद्यापीठाने पोलिसांत जाण्याऐवजी आधी मला याबाबत विचारणा केली असती तर मी हे गाणं युट्यूबवरुन हटवले असते, असंही रॅपर शुभम जाधव यानं म्हटले आहे.