भोसरी उद्यानातील सुविधा चालू करण्याची मागणी.
कै. सखूबाई गवळी भोसरी उद्यानात खेळणी खेळण्यासाठी, शाळांना सुट्टी लागल्या मुळे बालचमु गर्दी करीत आहेत. मात्र, सहल केंद्रातील लहान मुलांची झुकझुकगाडी आणि उद्यानातील संगीत कारंजे, बोटिंग बंद असल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. या सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी बालचमूंमधून होत आहे.भोसरीतील सहल केंद्रात लहान मुलांसाठी विविध खेळणी आहेत. विशेषतः झुकझुकगाडीबद्दल लहान मुलांमध्ये खूप उस्तुकता आहे.त्याचप्रमाणे येथे उत्तम प्रकारे लॅंडस्केपिंग असल्याने अबालवृद्ध सहल केंद्रात विरंगुळ्यासाठी येतात.उद्यानात संगीत कारंजे २०१९ मध्येच पूर्ण झाले आहे. मात्र, उद्घाटनाअभावी हे संगीत कारंजे अद्यापही बंदच आहे.
भोसरीतील जीवरक्षक कै. बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलावही दुरुस्तीसाठी बंदच आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना जलतरण तलाव, झुकझुकगाडी, संगीत कारंजे आणि बोटिंग यांचा आनंद घेता येणार नाही.