अजित पवार विरुध्द संजय राऊत असा,’सामना’ आता पहायला मिळणार
महाराष्ट्रातील राजकारणात महाविकास आघाडीमधील दोन मोठ्या नेत्यांमधील मतभेद समोर आले आहेत ते म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार विरुद्ध संजय राऊत यांचा.
काल अजित पवार यांनी काल भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम देतानाच संजय राऊतांवर घणाघाती टीका केली होती… त्यामध्ये त्यांनीं नाव न घेता म्हटले होते की, काही इतर पक्षाचे प्रवक्ते एनसीपीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत. त्यांना हा अधिकार कोणी दिला? पक्षाच्या बैठकीत हा मुद्दा मी मांडणार आहे तसेच त्यांना एनसीपीचे वकिलपत्र घ्यायची गरज नाही
आज संजय राऊत यांनीही नेहमीप्रमाणे उत्तर दिले.. ते म्हणाले मी नेहमी खरं बोलतो त्यामुळे मला टार्गेट केलं जातं. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही ,सामन्यात नेहमी खऱ्याच बातम्या असतात.
यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद आता समोर आले असून येत्या काळात यांच्यातील वाद मिटवण्याचं सर्वात मोठं आव्हान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.