बनावट चावी द्वारे वाहनांची चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
आरोपी नाव क्र. १) मोहम्मद मुदसीर उर्फ टॅटू उर्फ एम.डी. उर्फ जकी मोहम्मद युनूस वय २५ वर्ष, रा. न्यू टारफाईल, गाजीया मस्जिद जवळ, अकोला क्र. २) मंगेश कसनदास राठोड वय २५ वर्ष रा. जनुना ता. बार्शी टाकळी जि. अकोला पो.स्टे. पिंजर क्र.३) शेख मेहबुब शेख हसन वय ४० वर्ष, रा. जमील कॉलनी, सेवादल नगर, अमरावती क्र. ४) मुख्तार अली करामत अली वय २५ वर्ष, रा. धरमकाटाचे मागे, अमरावती –
मा. अमरावती ग्रामीण हद्दीत वाढत्या चारचाकी वाहनांच्या चोरीच्या घटनांना आळा बसविण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील श्री. अविनाश बारगळ (पो.अधीक्षक,अमरावती ग्रामीण) यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री. तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील पो.उप.नि मोहम्मद तस्लीम शेख गफुर यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकातील अधिकारी व अंमलदार हे चांदुर रेल्वे उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाली की, अकोला येथील सराईत चारचाकी वाहन चोर मो. मुदसीर उर्फ टॅटू उर्फ जकी हा जमजम कॉलनी अमरावती येथे वावरत आहे. त्याने अमरावती जिल्हयातील चारचाकी गाड्या चोरी केलेल्या आहे.
या मिळालेल्या माहितीवरून पोलीसस्टाफसह एक संशयीत ईसम येथे आढळून आला,त्याची सर्व कसून चौकशी केली असता त्यानी आपले नाव मोहम्मद मुदसीर उर्फ टैटू उर्फ एम.डी. उर्फ जकी मोहम्मद युनूस वय २५ वर्ष, (रा. न्यू टारफाईल, गाजीया मस्जिदजवळ,अकोला) असे सांगितले.
पथकातील काहींनी त्यास विश्वासात घेवून अमरावती ग्रामीण मधील तिवसा,चांदुर रेल्वे,धामणगाव रेल्वे येथील चोरी केलेल्या चारचाकी टवेरा क्रुझर, बोलेरो गाडीबाबत विचारले असता त्याने त्याच्या इतर साथीदारांची माहिती दिली.२) मंगेश कसनदास राठोड वय २५ वर्ष (रा. जनुना ता. बार्शी टाकळी जि. अकोला पो.स्टे. पिंजर)क३) शेख मेहबुब शेख हसन वय ४० वर्ष, (रा.जमील कॉलनी, सेवादल नगर, अमरावती )क्र. ४) मुख्तार अली करामत अली वय २५ वर्ष,(रा.धरमकाटाचे मागे,अमरावती)यांच्या
संगनमताने स्कॉरपिओ गाडीने घटनेच्या ठिकाणी जावून चारचाकी गाडीला त्यांनी बनावट चावीचा वापर करुन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच ही चारचाकी गाडी दवाखान्यासाठी पैसे लागणार असल्याचे सांगून व गाडीचे कागदपत्रे फायनान्स कंपनीमध्ये जमा असल्याचे सांगून गाडीचा नंबर बदलुन विक्री केल्याचे निष्पन्न झाले.
यातील मुख्य आरोपी मुख्तार अली करामत अली वय २५ वर्ष, (रा.अमरावती व मोहम्मद मुदसीर उर्फ टॅटू उर्फ एम.डी. उर्फ जकी मोहम्मद युनूस रा. अकोला) यांना अधिक सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी वर नमुद आरोपीसह जालना येथून २ टवेरा चारचाकी गाडी, चंद्रपुर जिल्हयातील भद्रवती येथून १ टवेरा गाडी, तिवसा जि. अमरावती येथून १ टवेरा गाडी, चांदुर रेल्वे येथून १ क्रुझर चारचाकी गाडी तसेच धामणगाव रेल्वे येथुन चोरी गेलेली बोलेरो जे शेलु पोस्टे मंगरुळपीर जि. वाशिम येथे बंद पडल्याने तेथेच बेवारस स्थितीत सोडून पळून गेले होते. अशा एकुण ६ गुन्हयांची त्यांनी कबुली दिल्याने १) पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे जि. अमरावती ग्रा. अप.क्र. १२२/२०२३ कलम ३७९ भादंवी, २) पो.स्टे. तिवसा जि. अमरावती ग्रा. अप.नं. २८/२३ कलम ३७९ भादवि ३) पो.स्टे. चंदनजिरा जि. जालना अप.नं. ११८/२३ कलम ३७९ भादवि ४) पो.स्टे. बदनापुर जि. जालना अप.नं. १०९/२३ कलम ३७९ भादवि ५) पो.स्टे. भद्रवती जि. चंद्रपुर येथील अप.नं. १४२ / २३ कलम ३७९ भादवि व ६) पो.स्टे. दत्तापुर जि. अमरावती ग्रा. अप.नं. १९५/२३ कलम ३७९ भादंवी अशी कलमे लावण्यात आली आहेत.हे सर्व गुन्हे उघडकीस आले असुन चारचाकी गाडी चोरीचे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरील गुन्हयातील सर्व चारचाकी गाडी एकुण २५,००,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील आरोपी व चोरीचा मुद्देमाल पो.स्टे.चांदूररेल्वे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अट्टल गुन्हे गारांची टोळी जेरबंद करण्याची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. शशिकांत सातव सा., पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात झाली. पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम शेख गफुर, पोउपनि संजय शिंदे, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, सहा.पो.उप.नि. अंबक मनोहर, पो.हे.कॉ. सुनिल महात्मे, पो.हे.कॉ. पुरुषोत्तम यादव, ना.पो.कॉ. सं. अजमत, ना.पो.कॉ. मंगेश लकडे, ना. पो. कॉ. चंद्रशेखर खंडारे, ना.पो.कॉ. सचिन मसांगे, ना. पो. कॉ. निलेश डांगोरे, चालक संजय प्रधान, हर्षद पुसे, शैलेश वानखडे व ना.पो.कॉ. सागर थापड, पो. कॉ. रितेश वानखडे सायबर सेल अमरावती ग्रा. यांनी केली आहे.