बांधकाम व्यावसायिकांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग होणार बंधनकारक…
शहरांचा वाढत जाणारा विस्तार, बेसुमार काँक्रिटीकरण त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.
त्यामुळे भूगर्भाची पाणी पातळी वाढवण्यासाठी.
सर्व प्रशासकीय कार्यालये,शैक्षणिक संस्था,कार्यालये, रहिवासी सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे आता बंधनकारक केले आहे. परंतु शहरातील बांधकाम व्यावसायिक याला गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प न उभारल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येणार नाही.शहरात अनेक टोलेजंग गृहप्रकल्प उभारले जात आहेत,शहराला गेल्या सव्वातीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.जमिनीतील पाणी पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन म्हणून पालिकेच्या वतीने सामान्य करात सवलतही देण्यात येत आहे. मात्र, तरीही नवीन गृहप्रकल्प उभारताना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बाबत बिल्डर निरुत्साही आहे.
शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले की काही व्यावसायिक रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारत असले तरी त्याची योग्य ती दुरुस्ती देखभाल वेळेवर करत नसल्याने ते बंद पडले आहे. परंतु आता रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प न उभारल्यास बांधकाम व्यवसायिकांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जाणार नाही