शहरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिकेचा उद्योजकांशी संवाद..
पिंपरी चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून असलेली राज्यभरातील ओळख आता पुन्हा वृद्धिंगत होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सीआयआय यांच्या संयुक्तिक विद्यमाने (दि.१९)इंडस्ट्री मीट अँड ग्रीट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त व शहरातील प्रमुख उद्योजक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सध्या महापालिकेच्या वतीने शहरी परिवहन पर्यावरण मनोरंजन सोयी सुविधा इलेक्ट्रिक वाहने इत्यादी प्रस्तावित प्रकल्पांची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. शहरातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने अशा प्रकारचा नवा संवाद साधला जाणार आहे. यावेळी उद्योजकांच्या प्रश्नावर आयुक्तांनी मार्गदर्शन केले. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उद्योजकांशी झालेल्या या विचार मंथनाचे उद्योजकांनी स्वागत केले आहे. पिंपरी चिंचवड शहराची उद्योग नगर म्हणून असलेली ओळख अधिक उत्तम व सुखकर व्हावी यासाठी उद्योजक कायमच आपले योगदान देतील असा विश्वास इंडस्ट्री मीट अँड ग्रीट आयोजनात दिला गेला.