राजकीय भूकंपाच्या विधानावर प्रकाश आंबेडकर ठाम
राज्याच्या राजकारणात येत्या 15 दिवसांत राजकीय भूकंप होणार असे विधान वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते,तसेचअजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगितले होते. त्यावर अजित पवार यांनी मी असा कोणता आहे निर्णय घेतला नाही असे स्पष्ट केले असले तरी प्रकाश आंबेडकर त्यांच्या विधानावर ठाम आहेत.
राज्यपाल, विधिमंडळ यात कोर्ट कोणताहीहस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर कोर्ट देखील भाष्य करणार नाही.उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिल्याने राज्यपालांचे आदेश मागे घेण्याबाबत घटनात्मक बंधन आहेत. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला जी स्थगिती दिली होती ती उठविली जाईल असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
