ठाणे, मुंबई परिसरात वाढत्या मोटार सायकल चोरी प्रकरण उघड,त्रिकुटास मुंब्रा पोलीसांकडून अटक.
मोटरसायकल चोरी करून त्यांची भंगारमध्ये विल्हेवाट लावणाऱ्या त्रिकुटास मुंब्रा पोलीसां कडून अटक करण्यात आली आहे.यामधे सुमारे ५,४०,००० रू किंमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या १२ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.
मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाल्याने मा.श्री गणेश गावडे, पोलीस उपआयुक्त परि-१ श्री विलास शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त,कळवा विभाग यांनी मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व उघडकीस आणण्याकरीता विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने व.पो.नि श्री निवृत्ती कोल्हटकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे किंवा उघडकीस आणण्या बाबतच्या सुचना दिल्या आहेत.याबाबतची आधिक माहिती अशी की दिनांक १५/०४/२०२३ रोजी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार ,
मुंब्रा पोलीस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना स.पो.नि / कृपाली बोरसे यांना अशी विश्वसनीय बातमी मिळाली होती की, एक इसमाने मुंब्रा परिसरातून वर्गमॅन मोटार सायकल चोरी केलेली असून तिची विक्री करण्याकरीता तो मुंब्रा बायपास रोड वरील मुंबा टोलनाका येथे येणार आहे. तपास पथकातील अधिकारी / अंमलदार यांनी या ठिकाणी सापळा लावून इसम नामे रकिव शब्बीर खान, वय-२९ वर्षे व्यवसाय- भंगार खरेदी विक्री, रूम नं. १०५, हाजरा मेन्शन बिल्डींग, सौ विंग, अलमास कॉलनी, कौसा, मुंब्रा ता. जि. ठाणे. याचेकडील मरून रंगाची बर्गमन मोटार सायकल क्रमांक MH04KK7101 सह ताब्यात घेतले.या इसमाकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचे ताब्यातील सदरची मोटार सायकल त्याने ठाणे येथील चोरीच्या मोटार सायकल खरेदी करणारा भंगार दुकानदार रविंद्र लालजी सरोज यांच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार नादीर हुसेन अंसारी याच्यासह मुंबा येथून चोरी केल्याचे सांगितले. ही मोटार सायकल चोरीबाबत मुंब्रा पोलीस ठाणे अभिलेख तपासला असता याबाबत मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा रजि क. २९९ / २०२३ भादवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल असून दिनांक १६/०३/२०२३ रोजी केसर महल बिल्डींग समोर, हसमत चौक, कौसा, मुंबा येथून चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल आहे. त्याअनुषंगाने केलेल्या चौकशीमध्ये रकिब शब्बीर खान याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला दिनांक १५/०४/२०२३ ला अटक करण्यात आली. त्याचेकडे पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासामध्ये त्याने नमूदचा गुन्हा त्याचा मुंब्रा येथील साथीदार नादीर हुसेन अंसारी याच्यासह केल्याचे सांगितल्याने त्याचा शोध घेवून ताब्यात घेतले. त्याचे पुर्ण नाव नादीर हुसैन अंसारी वय-३२ वर्षे, राह. रूम नं. ३०२, अब्दुलहक बिल्डींग, तिसरा माळा, सैनिक नगर, अलमास कॉलनी, कौसा, मुंब्रा ता. जि. ठाणे. याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात दिनांक १६/०४/२०२३ रोजी अटक करण्यात आली, दोन्ही अटक आरोपींकडे केलेल्या तपासादरम्यान ते मोटार सायकल चोरी करून ठाणे येथील भंगार दुकानदार रविंद्र लालजी सरोज यास विकी करीत होते. त्यांचेकडे अधिक तपास करून रविंद्र लालजी सरोज वय ३८ वर्षे, व्यवसाय- भंगार खरेदी विकी, राह. सिध्देश्वर तलावाजवळ, गुरखा चाळ, कॅडबरी कंपनीचे समोर, ठाणे (प) यास ताब्यात घेवून त्याचेकडे केलेल्या चौकशीत अटक आरोपी यांनी चोरी केलेल्या मोटार सायकल बेकायदेशीरपणे खरेदी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्हयात दिनांक १८/०४/२०२३ रोजी अटक करण्यात आलेली आहे.
आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या सखोल तपासामध्ये त्यांचेकडून एकूण ५,४०,०००/- रू किमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या १२ मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच ठाणे व मुंबई परिसरातील मोटार सायकल चोरीचे खालील ५ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.तसेच हस्तगत करण्यात आलेल्या इतर ७ मोटार सायकलींबाबत अधिक तपास चालू आहे.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री पंजाबराव उगले, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ – १ श्री गणेश गावडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग श्री विलास शिंदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती कोल्हटकर, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कृपाली बोरसे, पोहवा / १२५५ संतोष पवार, पोना / ६९३३ संतोष गायकवाड पोना / १२०२ निलकंठ लोंढे, पोशि/ ७६४१ अण्णासो एडके, पोशि/ ७७४० सोपान काकड, पोशि/ ७७४४ भुषण खैरनार, पोशि/ २६३४ नवनाथ चव्हाण, पोशि/ २११६ प्रमोद जमदाडे सर्व नेमणूक मुंब्रा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे. पुढील तपास पोना / १२०२ निलकंठ लोंढे हे करीत आहेत.