पुण्यात आज यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा गारांचा पाऊस
गेल्या काही दिवसांतील उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना आज गारांच्या पावसाने झोडपून काढले. या हंगामातील हा सर्वात मोठा गारांचा पाऊस आहे.
पुण्यात आज पाषाण, कोथरूड, आळंदी, मोशी,
हिंजेवडी आणि हडपसर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस झाला.तसेच दक्षिण पुण्यात विजेच्या कडकडासह बिबवेवाडी, कात्रज,धनकवडी आणि सिंहगड रोड येथे पाऊस झाला.अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.