गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात तब्बल 2 तास चर्चा
Hidanburg अहवाला नंतर गौतम अदानी व मोदींवर काँग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसने जेपीसीची मागणी केली होती त्यावर शरद पवारांनी वेगळी भूमिका मांडून जेपीसीने काही साध्य होणार नाही असं म्हटलं होतं.
काँग्रेस आणि शरद पवार यांच्यात वेगळी भूमिका आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर पवार यांनी विरोधक जेपीसीला आग्रही असतील तर माझा त्याला विरोध नाही असे म्हटले होते.
गौतम अदानी व शरद पवार यांची ही सुनियोजित भेट होती परंतु भेटी दरम्यान चर्चा कशावर झाली हे कळू शकले नाही ,त्यामुळे सर्वत्र तर्कवितर्कांना उत आला आहे