विरोधकांच्या टार्गेटवर असलेले माया कोडनानी आणि बाबू बजरंगी निर्दोष; गुजरात दंगलीतील नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
गुजरात दंगलीतील गोध्रा घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला नरोडा गावात बंदची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान सकाळी नऊच्या सुमारास लोकांच्या जमावाने बाजारपेठ बंद करण्यास सुरुवात केली आणि हिंसाचार उसळला. जमावात सामील असलेल्या लोकांनी जाळपोळ सुरू केली, दगडफेक करून तोडफोड केली आणि यात 11 जणांचा बळी गेला.यानंतर जवळच्या पाटिया गावातही दंगल पसरली होती, येथेही हत्याकांड घडले. या दोन भागात 97 जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. यावरून काँग्रेस व विरोधकांनी भाजपा सरकारला धारेवर धरले होते.
या प्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह 86 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
विशेष न्यायमूर्ती एसके बक्षी यांच्या न्यायालयाने या प्रकरणी सर्व आरोपींना आज निर्दोष मुक्त केले