🙏श्री गणेशाय नमः 🙏
आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे प्रतिपदा तिथि शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष भरणी नक्षत्र आयुष्मान योग
बालव करण
शुभ दिवस
आजचे ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु नेप व चंद्र मेष राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे
आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास चतुर्थेश भाग्येश पंचमेश युक्त असल्याने आजचा दिवस आवडत्या व्यक्तीच्या सहवासात जाईल परमार्थाकडे कल राहील हातून चांगल्या होतील दिवस सार्थकी लागेल
शुभ रंग निळा
भाग्य 90%
वृषभ रास
चतुर्थेश पंचमेश युक्त आहे विद्यार्थांना उत्तम दिवस आहे खेळ व शिक्षण दोन्ही मध्ये यश राहील घरात खूप दिवसांनी आनंदी वातावरण जाणवेल
शुभ रंग पिस्ता
भाग्य 54%
मिथुन रास
आज सुरवातीला डोकेदुखीचा त्रास होईल 11 नंतर दिवस उत्तम जाईल नातेवाईकाची खूप मदत होईल चंद्र सप्तमेश युक्त आहे जोडीदाराबरोबर भटकंती करावी लागेल
शुभ रंग निळा
भाग्य 76%
वाढत्या उष्णतेमुळे २१ एप्रिलपासून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर.
कर्क रास
चंद्र बळ उत्तम आहे नॉर्मल तापामुळे अंगात कसकस जाणवेल 3नंतर
आरोग्य उत्तम राहील
शुभ रंग वांगी
भाग्य 82%
सिंह रास
राशिस्वामी व्ययेश युती असल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल सकारात्मक विचार ठेवा
दुपारनंतर दिवस आनंदात जाईल मुलांची प्रगती उत्तम राहील
शुभ रंग पिवळा
भाग्य 60%
कन्या रास
मनाविरूद्ध प्रसंग येतील पण आपण धीराने तोंड द्याल अचानक खर्च उपस्थित होईल जोडीदाराची साथ उत्तम मिळेल
शुभ रंग पिवळा
भाग्य 54%