खंडणीची धमकी देणाऱ्यास पोलिसांकडून अटक,
आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, मनसेचे नेते वसंत मोरे अशा राजकीय नेत्यांना केले होते टार्गेट.
गेल्या काही दिवसापासून राजकीय नेत्यांना खंडणी मागणारे फोन येत असल्याने पोलिसांकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, मनसेचे नेते वसंत मोरे, यांना अशाप्रकारे धमकी देणारे फोन मागील महिन्यात आले होते.
गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात तब्बल 2 तास चर्चा.
याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून आरोपीचे नाव इमरान शेख व त्याचा साथीदार शाहानवाज खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपास केला असता एकच व्यक्ती धमकी देत असून ही धमकी देण्याचे एक वेगळेच कारण समोर आले आहे,इमरान शेख याचे एक विवाह नोंदणी कार्यालय आहे.यामध्ये एका मुलीने लग्नासाठी नोंदणी केली होती मात्र नोंदणी केलेल्या मुलीच्या प्रेमात इमरान शेख पडला पण मुलीने लग्नास नकार दिल्यामुळे त्याचा राग धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्यास सुरुवात केली. मुलीचे वेगवेगळे मार्क केलेले फोटो तिचा फोन नंबर व्हायरल केला व याच मुलीच्या नावे राजकीय नेत्यांकडे खंडणीची मागणी करण्यात येत होती मात्र गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला शोधून काढत ही कारवाई केली आहे.