वाढत्या तापमानात घ्या आरोग्याची काळजी.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा 39 डिग्री वर सरकला आहे. उन्हाच्या तीव्र झळा
पासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे अन्यथा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे यासाठी काढलेल्या परिपत्रकात त्यांनी काही सूचना केल्या आहेत.
अशी घ्या काळजी
१. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशापासून आपली काळजी घ्यावी. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल ,छत्री यांचा वापर करावा.
२. पुरेसे पाणी प्यावे ताक लिंबू सरबत, नारळ पाणी, विविध फळांचा रस असलेले द्रव पदार्थांचे सेवन करावे.
३. बाहेरून घरी परतल्यानंतर शक्यतो साधे किंवा कोमट पाणी प्यावे.
४. हलक्या रंगाचे पातळ सुती कपडे परिधान करावे.
वाढत्या उष्णतेमुळे २१ एप्रिलपासून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर.
हे टाळा
१. अनवाणी पायाने उन्हात चालू नये
२. दुपारी बारा ते चार च्या वेळात उन्हात जाणे टाळावे
३. मद्य,चहा,कॉफी,खूप साखर असलेल्या कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे
४. थंड किंवा बर्फाचे पाणी शक्यतो पिऊ नये
५. बाहेरील अधिक तापमानातून घरी आल्यावर लगेच आंघोळ टाळावी.
उष्माघाताच्या रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणे
•तीव्र डोकेदुखी
•स्नायुंचे आखडणे
•मळमळणे उलटी चा भास होणे
•चिंता वाटणे व चक्कर येणे
•हृदयाचे ठोके वाढणे धडधडणे
वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी असे आवाहन महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.