March 1, 2024
PC News24
आरोग्यजिल्हाजीवनशैलीठळक बातम्यामहानगरपालिकासामाजिक

पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई,नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना.

पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई,नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना.
उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागल्याने शहरात (pcmc)पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पावना धरण पाण्याची सातत्याने घटत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून शहरात फक्त एकदाच पाणीपुरवठा होतो. तापमानाचा पारा वाढल्याने शहरात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. एकीकडे पाण्याची मागणी वाढत असताना शहरात पाणी वाया घालवण्याचे प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत याची दखल महापालिकेकडून घेण्यात आली त्यामुळे पुण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिला आहे. जनसंवाद माध्यमातून पाण्या विषयीच्या तक्रारी वाढत असल्याने पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश सह शहर अभियंता सवणे यांनी संबंधित (pcmc) अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

Related posts

पुण्याच्या बाणेरमधे दाजीची मेव्हण्याकडून हत्या.

pcnews24

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सातुर्डेकर यांना ‘हिंदरत्न कामगार पुरस्कार’प्रदान

pcnews24

Thane : ठाण्यातील काही भागात पाणी कपात!

Admin

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी उद्या…सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आदेश जारी

pcnews24

कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज – उपचारासाठी 22 जणांना वायसीएम रुग्णालयात दाखल

pcnews24

पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी अर्ज भरण्यास मुदत,वाढीची आयुक्तांकडे मागणी:सचिन काळभोर.

pcnews24

Leave a Comment