मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक
पुणे संगमवाडी पुला जवळी खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मद्यधुंद तरुणाने धावत्या बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. संगमवाडी पूला जवळ या तरुणांनी बस थांबवल्यानंतर मद्य प्राशन अवस्थेत बस मध्ये चढून खिडक्यांची
तोडफोड केली. बसमधील प्रवाशांनी त्याला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल त्यांनी जसपाल सिंग जापणसिंग जुन्नी (वय,१९.पिंपरी) याला बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून काम करत असलेले बाळासाहेब वारे (रा बीड) यांनी याबद्दल तक्रार नोंदविली आहे.
त्यांच्या ताब्यात असलेली बीड जिल्ह्यातील ही बस रात्री पावणे अकराच्या सुमारास ते घेऊन जात होते, त्याचवेळी हा तरुण संगमवाडी पुलाजवळ अचानक आला, बस समोरील काचांवर दगडफेक केली,बस थांबवून हा तरुण बसमध्ये शिरला प्रवाशांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना या मद्य प्राशन अवस्थेतील तरुणाने धमकावण्याचा प्रयत्न केला.पोलीस पुढील तपास करीत आहेत