शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून चिंचवडच्या मॉलमध्ये महापालिकेकडून मॉकड्रिल घेण्यात आले.
महापालिका कार्यालयात आपत्कालीन स्थितीत कोणतीही घटना घडल्यास त्याला कसे सामोरे जायचे याविषयी महापालिकेकडून हे मॉकड्रिल करण्यात आले. हे मॉक ड्रील करताना मॉलमध्ये काही त्रुटी आढळल्याचे निदर्शनाला आल्याने महापालिके कडून शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पालिकेच्या मुख्य प्रशासकीय जागेत फायर मॉकड्रिल घेतले इमारतीमधील बसवण्यात आलेल्या अग्निशमन उपकरणांची चाचपणी घेण्यात आली, मात्र ह्या मॉकड्रिल मध्ये जवानांच्या शिट्ट्यांपेक्षा आगीच्या सूचनांचा अलार्म कमी ऐकू येत असल्याचे आढळून आले. तसेच इमारती मधे प्रचंड धूर झाल्यानंतर बाहेर पडताना आपण कोणत्या मजल्यावर आलो आहोत हे दिसून येत नव्हते.
इमारतीचे ऊन वारा पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी टेरेसवर लावलेल्या डोममुळे इमारती मधील धूर बाहेर जात नाही असे निदर्शनास आले. अशा महत्त्वपूर्ण त्रुटी समोर आल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी तात्काळ अग्निशामन विभागाला पालिका इमारतीचे ऑडिट करण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत
