ईद साजरी करण्यासाठी वाहतुकीचे सुयोग्य नियोजन
मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद निमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल कऱण्यात आला आहे.
चंद्रदर्शनानुसार मुस्लीम बांधव एकत्र येऊन आपल्या मोहल्यातील मशिद व ईदगाह मैदानावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण करत ईद साजरी करतात. यावर्षी22 किंवा 23 एप्रिल या तारखेला एक दिवस अगोदर किंवा पुढे रमजान ईद साजरी होणार आहे. नमाज पठणाच्या वेळी ईदगाह च्या जवळपास वाहनांची मोठया प्रमाणावर गर्दी होते. रस्त्यावर होणारी ही वाहतूक कोंडी टाळण्या करीता वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पुणे,गोळीबार मैदान चौक येथे होणाऱ्या नमाज पठणाच्या कार्यक्रमासाठी दि.22 अथवा 23 एप्रिलला सकाळी सहा ते नमाज पठण पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यकते नुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे.वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे असेल.
शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा.
1) सोलापूर रोडकडून मम्मादेवी चौक येथे येणारी वाहतूक ही गोळीबार चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा कमांड हॉस्पीटल मार्गे डाव्हर्शन करुन पुढे इच्छित स्थळी किवा नेपिअर रोडने पुढे सीडीओ कडे जातील.
2) गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाजपठणाच्या वेळी वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- गोळीबार चौकातून डाव्याबाजूस वळून सीडीओ चौक पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडे वळुन सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जातील.
3) सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतुक नमाज पठण काळात सकाळी सात से नमाज पठण होईपर्यंत वळविण्यात येणार आहे.पर्यायी मार्ग- लुल्लानगरकडुन येवुन खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतुक खटाव बंगला चौक नेपीयर रोड मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक भैरोबा नाला येथून किंवा गिरीधर भवनचौकातून इच्छित स्थळी जातील.
4) सेव्हन लव्हज चौक कडून गोळीबार मैदानकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग सॅलिसबरी पार्क सी.डी. ओ. चौक गैरो बनाला येथून इच्छित स्थळी जातील.
5) भैरोबानाला ते गोळीबार मैदानकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात येवून एम्प्रेस गार्डन व लुल्ला नगरकडे सोडण्यात येईल.पर्यायी मार्ग- प्रिन्स ऑफ वेल्स रोडने किया मैरोबानाला वानवडी बाजार चौक येथून इच्छित स्थळ जातील,
6) कोंढवा परीसरातून गोळीबार मैदानाकडे येणा-या सर्व जड मालवाहतुक वाहने,जड प्रवासी बसेस,
प्रवासी एस टी बसेस, पीएमटी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात येईल.पर्यायी मार्गाचा वापर करुन लुल्लानगर चौकातुन भैरोबा नाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जातील.याखेरीज शहरातील अन्य भागातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार असल्याने या भागातील वाहतुकीचे परिस्थितीनुसार तेथील वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल, तरी वाहन चालकांनी वाहतूक पोलीसांना सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळावी, असे पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त वियजकुमार मगर यांनी आवाहन केले आहे.