कोण संजय राऊत ? मी कोणाचे नाव घेतले होते का ? अजित पवारांची प्रतिक्रिया.
आज अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना संजय राऊत अजुनही तुमची बाजू मांडतायत असा प्रश्न केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना कोण संजय राऊत ? प्रत्येक प्रवक्त्यानं आपापल्या पक्षावर बोलावं, हे म्हणताना मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं, मग कुणाच्या अंगाला का लागावं? मी कोणाचे नाव घेतले होते का ? मग मी का अंगाला लावून घेऊ असे अजित पवार म्हणाले यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत या दोन नेत्यांमधील मतभेद कमी होण्याचे नाव घेत नाहीत.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले माझ्याबाबतच्या असणाऱ्या शंका-कुशंका डोक्यातून काढून टाका असं आवाहन अजित पवारांनी माध्यमांना केलं. सकाळ पेपरला विचारा. सकाळ पेपरचा कार्यक्रम आधीपासून ठरला होता असेही अजित पवार म्हणाले.