🙏श्री गणेशाय नमः 🙏
आज शनिवार दिनांक 22 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 2 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
दिन विशेष आज अक्षय तृतीया आहे साडेतीन मुहूर्तातील एक पूर्ण दिवस शुभ आहे आज सत्पात्री दान पितर तर्पण व कोणत्याही नवीन शुभारंभासाठी उत्तम दिवस आहे
आजचे ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु व चंद्र वृषभ राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे
आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आज भाग्येश गुरुचे मेष राशीत प्रवेश होत आहे वर्षभर गुरूची उत्तम साथ राहील कुटुंबासमवेत दिवस आनंदात जाईल
शुभ रंग पिवळा
भाग्य 58%
वृषभ रास
चंद्र शुक्र युती तुमच्या राशीत होते त्यामुळे समाजात तुमची वाहवा होईल सर्व बाजुंनी यशस्वी दिवस जाईल
शुभ रंग निळा
भाग्य 68%
मिथुन रास
आज कामाचा ताण राहणार नाही दुपारी बाहेर मेजवानीस जाल आज स्वतः कडे जास्त लक्ष द्याल
शुभ रंग हिरवा
भाग्य 62%
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत होणार पदभरती.
कर्क रास
आज चंद्र शुक्र युती लाभस्थानी होते खूप दिवसांनी असे चांगले क्षण येतात याचा अनुभव येईल आवडत्या व्यक्तीच्या सहवासात उत्तम दिवस जाईल
शुभ रंग पांढरा
भाग्य 87%
सिंह रास
दशमात चंद्र शुक्र युती तुमचे व्यक्तीमत्त्व खुलवणारी राहील आज आपण विशेष परिश्रमाने अनेकांचे मन आपण जिंकणार दिवस आनंदात जाईल
शुभ रंग मोर पंखी
भाग्य 88%
कन्या रास
आज प्रवासाचा बेत आखाल घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आपणांस मिळेल मोठ्या संकंटांतून सुटका होईल
शुभ रंग निळा
भाग्य 73%
तुळ रास
गुरु तुम्हाला आजपासून अनुकूल होत आहे नातेवाईकांशी संबंध सुधारतील नवीन ओळखी होतील दिवस फायदेशीर राहील
शुभ रंग निळा
भाग्य 53%
वृश्चिक रास
आज चंद्र शुक्र युती सप्तमात आहे तरूणांना प्रेमात यश राहील विवाह जुळतील कौंटम्बिक वातावरण प्रसन्न राहील शुभ रंग पांढरा
भाग्य 78%
धनु रास
मामाकडून लाभ राहील प्रवासात फायदा होईल
शत्रू माघार घेतील
शुभ रंग हिरवा
भाग्य 58%
मकर रास
आजचा दिवस करमणुकीत घालाल मुलांसोबत मजेत वेळ जाईल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल
धार्मिक ठिकाणी जाल
कुंभ रास
चंद्र शुक्र युती चतुर्थात आज आईशी मनमोकळेपणाने बोलाल जमीनखरेदीच्या व्यवहाराला गती मिळेल
शुभ रंग निळा
भाग्य 88%
मीन रास
भावंडांचे विशेष प्रेम मिळेल कुंटुंबात सर्व एकत्र आल्यामुळे खूप छान वाटेल कामात बदल होईल
शुभ रंग निळा
भाग्य 69%
श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार
चिंचवडगाव,पुणे
9689743507