आगामी आर्थिक वर्षात देशातील गेमिंग इंडस्ट्री तेजीत,”फ्रेमबॉक्स ऍनिमेशन इन्स्टिटयूटमधे“आर्टबॉक्स”चे प्रदर्शन.
जगभरात व्हर्च्युअल गेम्सच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.मोबाइल गेमवर होणारी उलाढाल बिलियन डॉलरच्यावर आहे. एका क्लिकवर आज लाखो व्हिडिओ गेम्स अगदी सहज उपलब्ध होतात. आठ-दहा तास मनसोक्त खेळूनही मन भरत नाही.
अनेक देशांमध्येही ऑनलाइन गेमिंगची मोठी क्रेझ पाहायला मिळते.
पण आता या गेमिंगचा उपयोग करून भविष्यात अनेकजण नोकरी मिळवू शकतात. आगामी आर्थिक वर्षामध्ये देशातील गेमिंग इंडस्ट्रीसह इतर AVC म्हणजेच अॅनिमेशन, व्हीएफएक्स, कॉमिक्स या सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील आठ वर्षांचा विचार केला तर, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स म्हणजेच AVCG क्षेत्रात सुमारे 20 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. खुद्द केंद्र सरकारनेच याबाबत दावा केला आहे.
पुण्यातील फ्रेमबॉक्स ऍनिमेशन इन्स्टिटयूटच्या (Pune) विद्यार्थ्यांनी जागतिक अशाच गेमिंगचा रोमांचकारी इतिहास उलगडला.
गेमिंग या संकल्पनेवर आधारित “आर्टबॉक्स” चे प्रदर्शन नुकतेच पुणेकरांना पाहायला मिळाले. यामध्ये 1972 मध्ये तयार करण्यात आलेली पॉंग या गेम पासून ते डक हंट, सुपर मारिओ, कॉन्ट्रा, कॉउंटर स्ट्राईक, जीटीए व्हाईस सिटीपासून अगदी पबजी पर्यंतच्या गेम कशा तयार करण्यात आल्या, त्यांचा इतिहास आणि लोकप्रियतेचा आढावा या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी घेतला.
यावेळी फ्रेमबॉक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी गुप्ता,कंपनीच्या उपाध्यक्षा विनिता बचानी आणि सहाय्यक महाव्यवस्थापक अमित छेत्री, स्वारगेट शाखेचे विनय बिनायके, सुनीता बिनायके यावेळी उपस्थित होते. यापूर्वी फर्ग्युसन कॉलेज रोड येथील इन्स्टिट्यूट मध्ये वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. भारतामध्ये गेम खेळणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. मोबाइल गेमवर होणारी उलाढाल बिलियन डॉलरच्यावर आहे असे रवी गुप्ता यांनी सांगितले.
कॉम्प्यूटिंगच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमध्ये व्हिडिओ गेम्सचे मोठे योगदान आहे. जागतिक ऑनलाइन गेमिंग मार्केट जगभरातील सर्वात वेगवान उद्योगांपैकी एक आहे. गेल्या दशकांमध्ये ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री मार्केट लोकप्रियतेच्या शिखरावर (Pune) आहे.