श्री गणेशाय नमः
आज रविवार दिनांक 23 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 2 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
चंद्र वृषभ मिथुन व कर्क राशीतून भ्रमण करणार आहे
या सप्ताहातील ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु मेष राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
रविवार सोमवार दुपारपर्यंत आरामदायी दिवस जाईल मंगळवार बुधवार कामासाठी प्रवासयोग आहे महत्वाचे कामे बुधवारी होतील गुरुवार शुक्रवार घरच्यांसाठी वेळ द्याल शनिवारी धार्मिक स्थळाला भेट द्याल तरुणांना चांगल्या नोकरीची कॉल येतील
वृषभ रास
रविवार सोमवार कुंटुंबासमवेत मजेत वेळ जाईल मंगळवार बुधवार कटकटीचे राहतील गुरुवार शुक्रवार अपेक्षित कामे होतील शनिवार बाहेरगावी जाल
मिथुन रास
रविवार सोमवार घरी सर्व जण असल्याने दिवस आनंदात जाईल मंगळवार बुधवारी मोठी खरेदी होईल गुरुवार शुक्रवारी हातून बऱ्याच चुका होतील हुशारीने राहा शनिवारी वाहवा मिळेल
कर्क रास
रविवार सोमवार लाभदायी जातील मंगळवार बुधवारी आ बैल मुझे मार अशी अवस्था होईल कोणावर जास्त भरोसा ठेवू नका
गुरुवार शुक्रवार शनिवार जोडीदारयाच्या साथीमुळे आनंदांत जातील
सिंह रास
सर्वात उत्तम आठवडा जाईल सोमवार मंगळवार तुमच्या कामाचे कौतूक होईल
शुक्रवार शनिवार किरकोळ आजारी पडाल
कन्या रास
रविवारी फिरण्यास जाल सोम मंगळवार कामात उत्साह राहील ज्येष्ठ व्यक्तीचा सहवास लाभेल
बुध गुरुवार आर्थिक लाभ राहील शुक्रवार शनिवार महागड्या वस्तूची खरेदी कराल
तुळ रास
रविवारी सोमवारी मनाविरुद्ध घटना घडतील मंगळवार बुधवारी मोठ्या व्यक्ती संपर्कात येतील विवाह इच्छुचे विवाह जमतील शुक्रवार शनिवार चांगल्या बातमी देऊन जातील
वृश्चिक रास
रविवार सोमवार उत्तम जातील मंगळवार लाभाचा राहील बुधवार कटकटीचा राहील गुरुवार शुक्रवार चांगली बातमी मिळेल शनिवार
प्रवासात मौज मस्तीत जाईल
धनु रास
रविवार सोमवार किरकोळ आजारात जातील मंगळवार बुधवारी अचानक धनलाभ मिळेल गुरुवार शुक्रवार शनिवार साधारण राहतील
मकर रास
रविवार सोमवार मंगळवार आनंदात जातील मंगळवारी वाहनाची काळजी घ्या
बुध गुरु शुक्रवारी समाजात मान मिळेल शनिवार उत्तम जाईल
कुंभ रास
रविवार सोमवार घरी आराम कराल मंगळवार बुधवारी गुरुवारी कामाचा व्याप खूप वाढवाल शुक्रवार शनिवार आर्थिक लाभाचे जातील
मीन रास
रविवार सोमवार प्रवासाचे योग मंगळवार बुधवार गुरुवार हॉटेलमध्ये जाणार कामाचा ताण कमी राहील शुक्रवार शनिवार लाभदायक जातील
श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार
चिंचवडगाव पुणे