पोलीस होणाऱ्या साईनाथची नक्षलींकडून निर्घृण हत्या….युवकांच्या प्रगतीला नक्षलींकडून विरोध
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात असलेल्या मर्दुल गावात सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षा’ची तयारी करणाऱ्या साईनाथ नरोटे या तरुणाची माओवाद्यांनी डोक्यात गोळी घालून निर्घृण हत्या केली आहे.
कोरोना काळानंतर गडचिरोली मधील बरेचसे युवक नक्षली मध्ये भरती होण्यापेक्षा पोलीस मध्ये भरती होण्यासाठी उत्सुक आहेत. हे लक्षात आल्याने येथील युवकांनी पोलीस भरतीत जाऊ नये यासाठी अशा प्रकारची दहशत नक्षलींकडून होत आहे.
साईनाथ नरोटे युवक पोलिसांचा खबऱ्या होता, अशी बदनामी परिसरात करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील या भागात आदिवासी व दलितांचे हे हत्यासत्र गेल्या 40 वर्षापासून अव्याहत सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून साईनाथ च्या कुटुंबीयांना नक्षलवादी कडून धमक्या देण्यात येत होत्या, आई-वडिलांची काळजी वाटल्याने आपले गडचिरोली ते शिक्षण अपूर्ण सोडून तो त्याच्या गावी परतला परंतु आई-वडिलांच्या डोळ्यात देखत त्याचे अपहरण करून नक्षलवादीने काही अंतरावर नेऊन त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.
गडचिरोली मध्ये केवळ ३४८ पोलीस भरतीची जागा असताना 25000 युवकांनी पोलीस भरतीत भाग घेतला. नक्षलींच्या या दहशतवादाला नजुमानता तरुण आता पुढे येऊ लागले आहे आणि हीच गोष्ट नक्षलवादीना नको असल्याने ते आधिक आक्रमक झाले आहेत. साईनाथ नरोटे ची हत्या करून नक्षलींचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे.
साईनाथ नरोटेच्या निर्घृण हत्येनंतर तरी समस्त मराठी जनता एकवटून या देशद्रोही माओवाद्यांना कायमचा धडा शिकवण्यास पुढे आली पाहिजे.संतोष नरोटे कुटुंबीयांना सहानुभूती दाखवणाऱ्या अनेकांना नक्षलवादीनी धमकी दिल्याचे समजते.