पुढील 15 दिवसांत ‘हे ‘ सरकार कोसळणार,संजय राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ ….
महाराष्ट्राचा राजकारणात अनेक मोठे बदल होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमातून समोर येत आहे..शिवसेना खासदार संजय राऊत यांची अनेक विधाने नेहमीच चर्चेत असतात, अशातच आज उद्धव ठाकरे यांच्या जळगावातील जाहीर सभेपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे मोठे विधान केलं आहे. पुढील पंधरा ते वीस दिवसात शिंदे फडणवीस सरकार कोसळणार आहे.
संजय राऊत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, की या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ आता निघालेलं आहे, फक्त सही बाकी आहे. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.