December 11, 2023
PC News24
जीवनशैलीज्योतिषराज्यव्यवसायसामाजिक

“अक्षय तृतीयेची ‘भेंडवळची घटमांडणी ” अंदाज,राजा कायम राहील असं भाकीत.

“अक्षय तृतीयेची ‘भेंडवळची घटमांडणी ” अंदाज,राजा कायम राहील असं भाकीत.

अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो, या दिवशी केली जाणारी कोणतीही गोष्ट अक्षय राहते अशी पारंपारिक समजत आजही कायम आहे. आपण विज्ञानात कितीही प्रगती करीत असलो तरी खेडोपाडी आजही भविष्यवाणीवर विश्वास ठेवणारे अनेक आहेत त्यातच महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील ‘घटमांडणी’तून केले जाणारे वर्षभराचे भाकीत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत असते.
गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते, असा दावा बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी करतात. भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं असतं. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून यंदाचा अंदाज जाहीर केला. या प्रथेला वैज्ञानिक आधार नाही. मात्र, शेतकरी यावर मोठा विश्वास ठेऊन आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसारच करतात.
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील ” भेंडवळची घटमांडणी ” चे अंदाज आज जाहीर करण्यात आले आहे.हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेल्या घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरून राज्यातील शेतकरी त्याच्या वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करीत असतात त्यामुळे या गट मांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं… पाऊस ,पीक परिस्थिती , हवामान , राजकीय , आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे हे अंदाज आज वर्तविण्यात आले आहेत.
पावसा संबंधीच्या अंदाजात
जून – पाऊस कमी , पेरणी उशिरा
जुलै – दोन्ही सर्वसाधासरण
ऑगस्ट – चांगला काळ , अतिवृष्टी होईल
सप्टेंबर – कमी पाऊस ,अवकाळी पाऊस,पिकांचे भरपूर नुकसान होईल.
पीक पाण्यासंबंधीचे अंदाज
आंबाशी कुलदैवत आहे त्यामुळे रोगराई राहील ..
कपाशी मोघम आहे फारशी तेजी नाही
ज्वारी सर्वसाधारण राहील
तूर मोघम पिक चांगले
मुग मोघम सर्वसाधारण
उडीद मोघम सर्वसाधारण
तील मोघम मात्र नासाडी होईल
बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल
भादली रोगराई वाढेल
साळी- तांदूळ चांगलं पिक येईल
मटकी – सर्व साधारण येईल
जवस – सर्व साधारण मात्र नासाडी होईल
गहू – सर्व साधारण बाजार भाव तेजीत राहील
हरभरा – अनिश्चित कमी जास्त पिक येईल.. मात्र नुकसान सुद्धा होईल
‘भेंडवळची घटमांडणी “भाकीतात राजकीय आणि देशासंबंधीचे अंदाजही व्यक्त केले जातात त्यामुळे
सर्वांचे सगळ्यात जास्त लक्ष लागले असते ते म्हणजे राजकीय अंदाज बांधणीवर आणि त्यात पुन्हा यंदा राजा कायम राहील असं भाकीत केल्यामुळे पुन्हा एकदा देशाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती पुढील वर्षी कायम राहील असे भाकीत भेंडवळमध्ये वर्तविण्यात आले आहे. परकीय राष्ट्रांकडून त्रास, मात्र संरक्षण खाते मजबूत राहील, असाही अंदाज यावेळी वर्तविण्यात आला.

Related posts

मद्यप्राशन केलेल्या तरुणाची धावत्या बसवर दगडफेक.

pcnews24

भारतीईंना पीसीन्युज२४ चा सलाम !!! 54 व्या वर्षी दहावीत मिळवले 54 टक्के गुण

pcnews24

संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीचा एस.पी.एम शाळेत ‘स्फूर्तिगाथा’ कार्यक्रम उत्साहात,स्फूर्तिदायी कवितांतून क्रांतिकारकांना अभिवादन!

pcnews24

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन- वारकरी संप्रदायावर आघात.

pcnews24

पंतप्रधानांच्या हस्ते 75 रूपयांच्या नाण्याचे अनावरण

pcnews24

आजचे आपले राशिभविष्य!!

pcnews24

Leave a Comment