नवले ब्रीज ठरतोय Accident point..
स्वामीनारायण मंदिर येथे भीषण अपघात
नवले ब्रीज येथे काल मध्यरात्री दोनच्या सुमारास नीता ट्रॅव्हल कंपनीची २५ प्रवाशांना घेवून जाणारी बस (MH ०३ CP ४४०९)कोल्हापूर ते डोंबवली असा प्रवास करीत होती, त्याच दरम्यान नवले पुलाजवळ साखरेची वाहतूक करणाऱ्या MH१० CR १२२४ ट्रकने बसला मागून धडक दिली.ही
धडक एवढी जोरात होती की दोन्ही वाहने पलटी झाली. या दुर्घटनेत २२ जण जखमी तर ४ जण जागीच ठार झाले. जखमींना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे.. नवले ब्रीजच्या वारंवार घडणाऱ्या
घटनांमुळे वाहतुकीच्या नियोजनाचा अभावाचा मुद्दा लक्ष्यवेधी ठरला आहे .