महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने चुकीचे पत्र सोशल मीडियावर बाहेर
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणा दरम्यान श्री. सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू झाला असल्याची बातमी ताजी असतानाच आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने समाजमाध्यमांवर एक बनावट व्हायरल झाले असून पत्रामुळे राजकारण तापले आहे.यापूर्वी आप्पासाहेबांनी पुरस्कार कार्यक्रमाच्या दरम्यान झालेल्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले होते यावेळी काढलेल्या पत्राचा वापर करीत मूळ मजकुरात फेरफार करुन हे पत्र तयार केले आहे.
शनिवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले.यात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. माझ्या श्री. सदस्यांचा मतांसाठी वापर केला असून माझ्या साधकांना कार्यक्रमासाठी मंडप टाकला नाही,त्यामुळे झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी सर्व श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे या बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून रेवदंडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.