महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा “निकाल’ लांबणीवर,सुप्रीम कोर्टातील ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण
महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे अनेक घडामोडी घडत असतानाच सर्वांचे लक्ष वेधून घेणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्त्वाचा निकाल लांबणी वर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याने निकालावर त्याचा परिणाम होणार आहे.
देशभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असून दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. कोरोनाने सुप्रीम कोर्टात देखील प्रवेश केला असल्याने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल देणारे चार न्यायाधीश यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.
न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, एस रवींद्र भट, जे बी पारडी वाला आणि मनोज मिश्रा या चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले असून प्रेम कोर्टातील नागरिक, पक्षकार, वकील यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.