चिंचवड, गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित,पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला
चिंचवडच्या गांधीपेठ तालीम मित्रमंडळाने दिनांक २६ ते ३०एप्रिल अशी पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला आयोजित केली आहे.चापेकर चौकाजवळील,चापेकर स्मारक उद्यानात दररोज सायंकाळी साडेसहाला ही व्याख्यानाला होणार आहे.
बुधवारी(ता. २६) ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नितीन शहा (जीएसटी सर्वसामान्यांच्या चष्म्यातून),यांच्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेचा प्रारंभ होईल. गुरुवारी (ता. २७) नरवीर तानाजी मालुसरे घराण्यातील डॉ. शीतल मालुसरे (नरवीर तानाजी मालुसरे यांचा अपरिचित इतिहास), शुक्रवारी (ता. २८) जलसंपदा विभागातील निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे (नागरीकरण आणि पाणी), शनिवारी (ता. २९) योग अभ्यासक हिरामण भुजबळ (योग एक जीवनशैली) आणि रविवारी (ता. ३०) गिरीश प्रभुणे (भारतीय इतिहासातील वंचित घटनांची सुवर्णपाने) यांचे व्याख्यान होईल.रविवारी,
व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी चिंतामणी,क्रांतिवीर चापेकर आणि जिजाऊ या पुरस्कारांचे वितरण होईल. बत्तिसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या जिजाऊ व्याख्यान मालेतील विनाशुल्क व्याख्यानांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी केले आहे.