September 26, 2023
PC News24
आमचे बोलणेगुन्हाजीवनशैलीमहानगरपालिकाराज्यशाळा/महाविद्यालय/शैक्षणिकसामाजिक

पोलिसांचे विशेष बाल पथक करते आहे समुपदेशन,चुकीच्या मार्गाला मिळणार योग्य ‘वळण’.

पोलिसांचे विशेष बाल पथक करते आहे समुपदेशन,चुकीच्या मार्गाला मिळणार योग्य ‘वळण’

आपला मुलगा कमी वयातच व्यसनाच्या आहारी गेला आणि वाईट मुलांच्या संगतीत राहून चुकीच्या मार्गाला लागला तर मुलाचे पुढे कसे होणार ही चिंता धुण्याभांड्याची कामे करणाऱ्या आईला आणि खाजगी नोकरीतील वडिलांना सतावत आहे.
सध्या विविध गुन्ह्यांत बाल गुन्हेगारांचा वाढता सहभाग वाढत आहे. अशा मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष बाल पथका मार्फत दिशा उपक्रम राबविला जात आहे.वाईट मार्गाला लागलेल्या मुलांचे समुपदेशन करून होणाऱ्या परिणामांची जाणीव पथकाकडून करून दिली जाते आहे.
भोसरीतील बालाजीनगर येथील पुनर्वसन झालेल्या एका मुलाच्या आईने व्यक्त केलेली भावना अतिशय बोलकी आहे,”एका कोर्सचे प्रशिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलांना ऊर्जा दिली, शिक्षणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे आमच्या मुलासह आम्हालाही एकप्रकारे नवजीवन मिळाले.’’
या पथकाकडून दिशा भरकटलेल्या मुलांना समुपदेशन व विविध कोर्सचे मोफत प्रशिक्षण देत रोजगार मिळवून देण्यासह शिक्षणासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.या अंतर्गत ४१० मुलांचे समुपदेशन केले असून, २३ शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. तर अनेक मुलांनी विविध कोर्स पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे.एका सामाजिक संस्थेच्या मदतीने वस्ती व झोपडपट्टी भागातील विधी संघर्षित बालकांसाठी मेळावा आयोजित केला होता. त्यातून ७ बालकांनी एका इन्स्टिट्यूटमध्ये मोफत कोर्स पूर्ण केला. त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले. ही मुले आता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये व दुकानांमध्ये कामाचा अनुभव येण्यासाठी कार्यरत आहेत. तसेच भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे.पुनर्वसन झालेल्या काटे वस्ती(दापोडी)येथील मुलाने मी वाईट संगतीत राहिल्याने मार्ग चुकलो होतो. असे सांगितले त्याच वेळी या पथकाचे मार्गदर्शन व मदत मला मिळाली. त्यांच्या माध्यमातून मोबाईल रिपेअरिंगच्या माध्यमातून कोर्सही त्याने पूर्ण केला. आता एका दुकानात अनुभवासाठी काम करीत असून लवकरच स्वतःचे दुकान सुरु करणार आहे.
सहायक पोलिस आयुक्त तथा समन्वयक विशेष बाल पथकाच्या प्रेरणा कट्टे, यांनी माहिती दिली की भरकटलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असतात. यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. विविध सामाजिक संस्थांचीही मदत यासाठी घेतली जाते. अनेक मुलांना समुपदेशन करून त्यांच्यात बदल घडवला आहे.
चुकलेल्या मुलांना योग्य वळणावर आणण्याचे विशेष बाल पथकाचे हे प्रयत्न स्तुत्य आहेत.

Related posts

करोडो मराठा जोडणारे युवा प्रवीण पिसाळ यांचे निधन

pcnews24

सुस,म्हाळुंगे,बावधन पाणी प्रश्न ‘ तापला ‘,येथील सोसायट्यांना मागवावे लागते दररोज किमान पाच टँकर पाणी.

pcnews24

मोशी:स्कूलबसमध्ये ९२ विद्यार्थी;मोशीतील ‘एक्सलन्स स्कूल’ मधील धक्कादायक प्रकार.

pcnews24

घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्रास महापालिकेची मान्यता.

pcnews24

निगडी बस स्टॉप ते इन्स्प्रिया मॉल ट्रॅव्हल्स बसमुळे वाहतूक कोंडी,रस्त्यावर झोपून आंदोलनाचा इशारा.सचिन काळभोर

pcnews24

संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीचा एस.पी.एम शाळेत ‘स्फूर्तिगाथा’ कार्यक्रम उत्साहात,स्फूर्तिदायी कवितांतून क्रांतिकारकांना अभिवादन!

pcnews24

Leave a Comment