‘टी टाईम : 50 नॉट आऊट!’
मास्टर ब्लास्टर,क्रिकेटचा देव अशी ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आज 50 वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन कुटुंबासह गोव्यात गेला आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तो स्विमिंगपूलमध्ये पाय टाकून चहा पिताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सचिन हा पाठमोरा बसला आहे. त्याबरोबर तो निसर्ग सौंदर्याचाही आनंद घेताना दिसत आहे.या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
चिंचवड, गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित,पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला.
‘टी टाईम : 50 नॉट आऊट!’
सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला. सचिन आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. तो ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.