शरद पवार यांच्या वक्तव्याने आघाडीत संभ्रम.
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा श्री.शरद पवारांना महाविकास आघाडीनं २०२४ च्या निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली. “आम्ही एकत्र लढणार वगैरे बद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे.पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल? ” शरद पवारांच्या या वक्तव्याने आघाडीत संभ्रम झाला आहे. त्यावर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सावध भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी.
महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी मुंबईत मविआची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर अशाही सभा होणार आहेत” असं संजय राऊत म्हणाले.