श्री गणेशाय नमः
आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023
मिती वैशाख मासे शुक्ल पक्षे 5 शालिवाहन शके 1945 शोभन नाम सवंत्सरे
चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल
आजचे ग्रहमान
रवि बुध राहू हर्षल – मेष
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत केतू तुळेत
शनि कुंभेत
गुरु मेष राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून सर्व राशींचे आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
चंद्र गुरु शनि मंगळ अनुकूल आहेत प्रवास कराल जनमानसात तुमचे व्यक्तीमत्त्व बहारदार राहील जोडीदाराची साथ उत्तम राहील मुलांकडे लक्ष द्या
शुभ रंग लाल
भाग्य 86%
वृषभ रास
रवि बुध गुरु अनुकूल नाहीत कोणालाही शब्द देऊ नका कोणालाही उसनवारी देऊ नका शेयर मध्ये पैसे गुतंवू नका
शुभ रंग हिरवा
भाग्य 66%
मिथुन रास
रवी शनि बुध गुरु चंद्र अनुकूल आहेत आजचा दिवसाचा जास्तीत जास्त फायदा घ्या योग्य गुंतवणूक कराल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
शुभ रंग पांढरा
भाग्य 90%
कर्क रास
रवि बुध गुरु शुक्र अनुकूल चंद्र प्रतिकूल आहे विचारयांचे काहूर माजेल जुन्या गोष्टी आठवू नका मुलांची प्रगती लक्षणीय राहील
शुभ रंग हिरवा
भाग्य 55%
सिंह रास
सर्वात कर्तबगार रास व आज रवि बुध गुरु शुक्र शनि चंद्राची पण उत्तम साथ लाभेल संधीचे सोने करा कौटुंबिक वाद मिटतील
शुभ रंग लाल
भाग्य 79%
कन्या रास
चंद्र शुक्र मंगळाची साथ तुम्हाला मिळेल बंधू सौख्य उत्तम राहील बहिणीबरोबर वाद होतील जोडीदाराची उत्तम साथ मिळेल
शुभ रंग मरून
भाग्य 80%
तुळ रास
आज सर्व ग्रहांची तुम्हाला साथ आहे चंद्र मार्केश बरोबर असल्याने वितंडवाद घालू नका धार्मिक स्थळी भेट द्याल
शुभ रंग पिवळा
भाग्य 75%
वृश्चिक रास
शनि शुक्र रवि बुध अनुकूल आहेत चंद्र प्रतिकूल आहे शांतपणे काम करण्याइतका वेळ आपणाकडे नाही आज जबरदस्त डोके चालवून कामे पूर्ण कराल जोडीदाराशी थोडे मतभेद होतील सायंकाळ मजेत जाईल
शुभ रंग पिवळा
भाग्य 59%
धनु रास
आज सर्व ग्रह अनुकूल आहेत नवीन व्यवसाय सुरु कराल मुलांची प्रगती उत्तम राहील
शुभ रंग हिरवा
भाग्य 87%
मकर रास
शुक्र मंगळ अनुकूल आहेत गृहसौख्य उत्तम राहील स्पर्धा परीक्षेत यश मिळेल शत्रू शरण येतील
शुभ रंग काळा
भाग्य 66%
कुंभ रास
आज वाहने हळू चालवा तब्येतीची काळजी घ्या गृहसौख्य उत्तम राहील बाहेर वाद होतील
शुभ रंग पांढरा
भाग्य 84%
मीन रास
आज लाभदायी दिवस आहे आईकडे मन हलके कराल स्वास्थ्य उत्तम राहील
शुभ रंग हिरवा
भाग्य 65%
श्री शरद कुलकर्णी
चिंचवडगाव पुणे
9689743507