घरफोडी गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक,सर्व अटक आरोपी पिंपरी चिंचवडमधील
मुंबई,गोरेगाव पश्चिम येथील अथर्व सुनील बर्वे (वय 25) यांच्या एमजी रोड, शॉप नंबर दोन,आय टी नगर येथील मिठाईच्या दुकान आहे. दरवाज्याचे टाळे तोडून ४अज्ञात इसमांनी रोख रक्कम 10,000/- व वन प्लस कंपनीचा मोबाईल 25000/-* चोरल्याचे आढळले आहे.याबाबत गोरेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळावरील व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कसून पाहणी केली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येत असलेली व्यक्ती हा अभिलेखावरील आरोपी असल्याची ओळख पटली आहे. दिनांक 22/04/2023 रोजी 15.15 वाजता अटक केली आहे.आरोपी विकास कांबळे हा सेंट्रल लॉक असलेल्या दुकानाचे लॉक तोडून त्यातुन 5 ते 10 रूपये रक्कम चोरी करतो जेणे करून चोरी झाल्या नंतर तक्रारदार पोलिस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी जाणार नाही.त्याच्याकडून *वन प्लस कंपनीचा मोबाईल व 2000 अंदाजे किंमत 17000/-*चा माल हस्तगत केला आहे.आरोपीस रत्ना नाका, एस.वी. रोड. येथून गोरेगाव पश्चिम मुंबई. येथून शीताफिने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न होत असल्याने त्यास रीतसर अटक केली आहे. न्यायालयाकडून आरोपीची पोलीस कोठडी प्राप्त करून पोलीस कोठडी दरम्यान आरोपीताकडे कौशल्यपूर्ण तपास करून उपरोक्त नमूद गुन्ह्या मधील मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.विकास दिलीप कांबळे उर्फ विकी. (वय 27 वर्ष, हाउसिंग सोसायटी कुदळवाडी, चिखली), गौतम दीपक कदम.(वय 23 वर्षे, हनुमान मंदिराजवळ, पिंपरी चिंचवड),अरुण बिपिन परदेशी.( वय 23 वर्षे, राठी बौद्ध नगर,हनुमान मंदिरा जवळ पिंपरी चिंचवड)निसर आली नजर मोहम्मद शहा.(वय 32 वर्ष राठी काळेवाडी तपकिरी मळा चौक, न्यू महाराष्ट्र दरबार बिर्याणी, पिंपरी चिंचवड)हे सर्व अटक आरोपी पिंपरी चिंचवड येथील आहेत.सदरचा गुन्हा पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग श्री राजीव जैन. सो. मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ श्री अजय बंसल. साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त, रेणुका बागडे. गोरेगाव विभाग, पोलीस निरीक्षक, दत्तात्रय थोपटे. सर पोलीस निरीक्षक गुन्हे नीलिमा जाधव यांच्या मार्गदर्शना खाली उघडकीस आणण्यात आलेला आहे.
तपास पथक – गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील.