June 1, 2023
PC News24
ठळक बातम्याराजकारण

सुप्रिया आणि सदानंद सुळेंचे अदानीच्या कंपन्यात शेअर्स.

सुप्रिया आणि सदानंद सुळेंचे अदानीच्या कंपन्यात शेअर्स

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथ पत्रात अदानी कंपनीच्या आपल्या कुटुंबाकडे असलेल्या शेअर्सचा तपशील दिला होता. दरम्यान,हिंडनेबर्ग अहवाल जाहीर होण्यापूर्वी या 45 हजार शेअर्सचे बाजारमूल्य 11 कोटी 68 लाख रूपये एवढे होते. मात्र, आता सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे हे 45 हजार शेअर्स अद्यापही आहेत की नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. जर सुप्रिया सुळे यांच्याकडे हे शेअर्स आजही असतील तर त्यांच्या 45 हजार शेअर्सचं मूल्य हे केवळ 2 कोटी 84 लाख एवढं झालं असेल. कारण हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर त्यांना देखील मोठा फटका बसलेला असू शकतो.

शरद पवार यांनी मुलाखतीत मांडली वेगळी भूमिका

शरद पवार यांनी 7 एप्रिलला अदाणी समूहाच्या एनडीटीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, पूर्वी सरकारकडून टीका करण्यासाठी टाटा-बिर्ला समूहावर आरोप केले जायचे. पण नंतर लोकांना कळलं की या दोघांनी देशासाठी मोठं योगदान दिले आहे. मात्र आताच्या काळात अदानी-अंबानींना लक्ष्य केले जाते. पण अंबानींनी पेट्रोकेमिकल आणि इतर क्षेत्रात भऱीव योगदान दिले होते, तर अदानींना वीजसह इतर क्षेत्रात मोठं योगदान दिले होते. देशाला त्यांची गरज आहे. जर या समुहाने काही चुकीचे किंवा बेकायदा केले असेत तर त्या संदर्भात पुरावे सादर करण्याचे अधिकार लोकशाहीत असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. तसेच पवारांनी जेपीसीची मागणी व्यवहार्य नसल्याचा दावा केला होता.या विधाना नंतर पवारांनी विरोधकांच्या मागणीतली हवाच काढून घेतल्याचं म्हटले गेले आहे.

Related posts

विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद.

pcnews24

धानोरकर यांचे निधन… राजकीय प्रवास

pcnews24

सुस,म्हाळुंगे,बावधन पाणी प्रश्न ‘ तापला ‘,येथील सोसायट्यांना मागवावे लागते दररोज किमान पाच टँकर पाणी.

pcnews24

महापालिकेच्या वतीने महिला सबलीकरणाचा ‘सिद्धी उपक्रम’३०० महिलांकडून होणार मालमत्ता कराच्या देयकांचे वाटप.

pcnews24

सुप्रीम कोर्टात कोणकोणत्या याचिका आहेत ? – सत्तासंघर्षाप्रकरणी प्रमुख 4 याचिका कोर्टात दाखल आहेत.११:४० वा.निकाल.

pcnews24

बारामती अँग्रोला दंड,रोहित पवारांना मोठा दणका.

pcnews24

Leave a Comment