उत्कृष्ट,वाङ् मय पुरस्कार आणि लक्षवेधी वाङ् मय पुरस्कार मसाप पिंपरी चिंचवड शाखेतर्फे जाहीर.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे
कादंबरी,कथा,ललित,कविता आणि बालसाहित्य अशा पाच साहित्य प्रकारातील पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषद चिंचवड शाखेतर्फे गौरविण्यात येते. यावर्षी शुक्रवारी(ता.२८) पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे.पुरस्कारांसाठी महाराष्ट्र तसेच बृहन महाराष्ट्र पुस्तकां मधून उत्कृष्ट वाङ् मय पुरस्कार आणि लक्षवेधी वाङ् मय पुरस्कार जाहीर करण्यात येतात.यामधे कादंबरी करीता डॉ. स्मिता दातार मुंबई(-फक्त ‘ती’च्यासाठी) शितल देशमुख डहाके यवतमाळ (व्हेन माय फादर) ललितसाठी धनश्री लेले ठाणे (अलगद), आणि नंदकुमार मुरडे पुणे यांना (दस्तऐवज शब्दांचा) यांना कथा विभागा साठी दत्तात्रय सैतवडेकर मुंबई यांचे (ब्रेकिंग न्यूज) रमेश पिंजरकर पुणे यांचे (अरण्यरुदन) तर कविता प्रकारात शशिकांत हिंगोणेकर जळगाव यांचा (युद्धरथ), व विलास गावडे पनवेल यांचा (देशाचं महानिर्वाण) आणि बालसाहित्य विभागासाठी विनोद पंचभाई यांचे चरित्रात्मक वर्णन असलेले हे खरे जगज्जेते व मुऱ्हीरी कराड लातूर यांचा काव्यसंग्रह नव्या जगाची मुले (विभागून) आणि रमेश वंसकर यांचा कविता संग्रह आईस्क्रीमचं तळे यांना जाहीर झाला आहे असे मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे शाखाध्यक्ष श्री राजन लाखे यांनी सांगितले.