खासगी ट्रॅव्हल्स बसला पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
पुणे-सोलापूर महामार्गावर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत काल रात्रीझालेल्या
भीषण अपघातात एक खासगी बस उलटल्याने १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याकडून सोलापूर मार्गे तेलंगणाच्या दिशेने जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस रात्री नऊच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते. एका दुसऱ्या वाहनाला बसची धडक होऊ नये यासाठी अचानक ब्रेक लावावे लागले आणि त्यामुळे बस उलटली अशी प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली.
ढाब्यात जेवण केल्यानंतर सर्व बसमध्ये परतले, त्यानंतर बस दुसऱ्याने चालवायला घेतली अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघाताच्या वेळी बस खूप वेगात होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींने दिली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले व मदतकार्य सुरू केले.अपघातामुळे महामार्गावरील पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.