एका फोन कॉलनं बदललं आयुष्य,अभिनेत्रीला मिळाली नवी संधी
सिनेक्षेत्रातील अभिनेत्री आपल्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यात जास्त चर्चेत असतात.अशीच नवऱ्या पासून वेगळं झाल्यानंतर व अभिनयातून ब्रेक घेतलेली अभिनेत्री सोनाली नागरानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सोनालीचा बॉयफ्रेंड व शिराज भट्टाचार्यया दोघांनी केरळमध्ये घरच्यांच्या संमतीने लग्न केलं होतं. मात्र,2019 मध्ये म्हणजे लग्नाच्या सहा वर्षांनंतर दोघांच्यातील मतभेदांमुळे हे लग्न तुटले. त्यानंतर सोनालीनं अभिनयातून देखील ब्रेक घेतला.
ईटाइम्सशी बोलताना सोनाली म्हणाली की, माझ्याकडे एकही काम नसल्यामुळे मी निराश झाले होते, आतून खूप तुटले होते. माझ्या कुटुंबाची किंवा स्वत:ची काळजी घेण्यास मी असमर्थ होते. मला स्वतःचाच तिरस्कार वाटायचा. त्यामुळे माझा आत्मविश्वास पूर्णपणे तुटला होता. नेहमी फक्त आणि फक्त आनंदी असलेली ती पहिली सोनाली कुठं तरी हरवली होती.नैराश्यात असल्याने फक्त पीडित म्हणून सोनाली तिचे आयुष्य जगत होती. पण मग येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोनं करू शकेन.हे लक्षात आल्यावर हळूहळू तिने स्वत: च्या जखमा विसरण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर काहीतरी नवीन करण्याचा विचार करत होती.
इंडियन क्रिकेट लीग होस्ट करणाऱ्या सोनालीने सांगितले की, लग्नाच्या जवळपास पाच वर्षांत मी कोणतेही काम केले नाही. अशा तऱ्हेने मला पुन्हा काम सुरू करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
उत्कृष्ट,वाङ् मय पुरस्कार आणि लक्षवेधी वाङ् मय पुरस्कार मसाप पिंपरी चिंचवड शाखेतर्फे जाहीर.
वेळ घालवण्यासाठी मी ही सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवू लागले. शेवटी एका टप्प्यावर याला देखील कंटाळले. त्यानंतर मी मुंबई सोडून गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला.अभिनेत्रीने पुढे सांगितले की, आपल्या नशिबात जे काही लिहिले आहे तेच शेवटी होतं असते. अशा निराशेत जेव्हा मी सर्व काही सोडायचा निर्णय घेतला , तेव्हा त्याचवेळी मला एका कास्टिंग कंपनीचा फोन आला. कंपनीने मला ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये भूमिका ऑफर केली होती. यासाठी मला कोणतीही ऑडिशनही द्यावी लागली नाही. तांडव मधील भूमिकेने मला ही इंडस्ट्री सोडण्यापासून वाचवले.त्यामुळे माझ्यासाठी हा एखादा चमत्कारच असल्याचे सोनालीने सांगितलं.