पोहण्यासाठी गेलेल्या एका अभियांत्रिकी तरुणाचा बुडून मृत्यू
जाधववाडी(त.दा.)येथे इंद्रायणी नदीत पोहायला गेलेल्या मध्यप्रदेशातील अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेला तरुण आदित्य शरद राणे याचा बुडून मृत्यू झाला आहे.दिनांक, २५ ,तळेगाव दाभाडे येथील एका महाविद्यालयातील सहा तरुण इंद्रायणी नदीत पोहायला गेले होते. त्यातील तीन तरुण पोहताना बुडाल्याचे समजले,पैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले मात्र आदित्य राणे याला वाचविण्यात यश आले नाही.