व्हेरॉक वेंगसरकर अकादमीचा ‘अद्विक तिवारी’ सामनावीर
काल १६ वर्षाच्या खालील वयोगटासाठी व्हेरॉक वेंगसरकर अकादमी तर्फे मंगळवारी(दि. 26) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला पिंपरी चिंचवड मनपाच्या स्थापत्य विभागाकडून वैशाली ननावरे आणि राजश्री सातळेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.व्हेरॉक अकादमीचे प्रशिक्षक चंदन गंगावणे, शादाब शेख, चिंतामणी वैद्य आणि डॉक्टर विजय पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
काल पहिला सामना डेक्कन जिमखाना क्रिकेट संघ आणि व्हेरॉक वेंगसरकर अकादमी संघ यांच्यात झाला.
व्हेरॉक संघाने पहिली फलंदाजी केलेल्या या 45 षटकाच्या सामन्यात 217अशी मोठी धावसंख्या उभारली.व्हेरॉक आरव धनकुडे,अर्णव गोळे यांनी उत्तम खेळी केली.या खेळाचा सामनावीर ठरलेला व्हेरॉक अकादमीचा अद्विक तिवारी याने 80 चेंडूत
61 धावा काढत गोलंदाजीतही तीन बळी घेतले. प्रतिस्पर्धी असलेला डेक्कन जिमखाना संघाची फलंदाजी फारशी चमकदार नव्हती,अवघ्या 144 धावांत हा संघ पूर्ण बाद झाला.