हिंजवडी पोलिसां कडून जबरी चोर्या करणार्यांचा पर्दाफाश,चांदणी चौक परिसरातील अनेक गुन्हयांची उकल
दि. 1 एप्रिल 2023 रोजी यश नागेश मळगे (30, रा. कोथरूड) हे रात्री 11.30 च्या सुमारास चांदणी चौकाच्या अलिकडे असणार्या काचेच्या बिल्डींग शेजारील सर्व्हिस रोडवर बावधन येथे फोनवर बोलत उभे असताना त्यावेळी एकाने जबरदस्तीने त्यांच्या खिशातील पैशाचे पाकीट काढून मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रामदास बबन कचरे ( 22, रा. सोलमलोन, ता. महाड, जि. रायगड. सध्या रा. डोनजे गाव, ता. हवेली, जि पुणे) यांना अटक केली आहे.
त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीनीं त्यांच्याकडील मोटारसायकल देखील जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.तसेच चांदणी चौकाच्या अलिकडील परिसरात कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणार्यांचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या म्होरक्यासह दोन अल्पवयीन मुलांच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आले आहे.यामधे पोलिसांनी 1 लाख 18 हजार 700 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.