May 30, 2023
PC News24
आमचे बोलणेआरोग्यठळक बातम्यामहानगरपालिकासामाजिक

महापालिकेच्या वतीने महिला सबलीकरणाचा ‘सिद्धी उपक्रम’३०० महिलांकडून होणार मालमत्ता कराच्या देयकांचे वाटप.

महापालिकेच्या वतीने महिला सबलीकरणाचा ‘सिद्धी उपक्रम’३०० महिलांकडून होणार मालमत्ता कराच्या देयकांचे वाटप

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके वाटण्यास प्रारंभ झाला आहे.या मालमत्ता कर देयकांच्या वितरणा साठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘सिद्धी उपक्रम’ सुरू केला आहे.
पिंपरी- चिंचवड शहरात ५ लाख ९७ हजार ७८५ मालमत्ता आहेत. करआकारणी व करसंकलन विभागाने या देयकांची छपाई केली आहे.
महिला सबलीकरणासाठी बचत गटाच्या महिलांना सोमवारी (दि. २४)याचे प्रशिक्षण दिले.
मालमत्ता कराच्या देयकाची, नागरिकांची कोणती माहिती भरून घ्यायची त्या विषयी त्यांना माहिती देण्यात आली. देयके वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी योग्य नियोजन केले असून महिलांना ओळखपत्रेही देण्यात आली आहेत. देयकांचे वाटपही सुरू केले आहे.करसंकलन विभागाच्या ॲपद्वारे या महिला माहितीचे संकलन करणार असून यात मालमत्ता धारकांचा संपर्क क्रमांक,पत्ता नव्याने समाविष्ट करता येणार आहे.मालमत्तेचे अक्षांश व रेखांश यामुळे मालमत्ता शोधणे सोपे जाणार आहे.
प्रत्येक मालमत्तेचे छायाचित्र घेता येणार असल्याने मालमत्तेची माहिती परिपूर्ण होण्यास मदत होईल.या अद्ययावत माहितीचा फायदा करसंकलन विभागास पुढील काळात वसुली, देयके वाटपास होणार आहे.
दरम्यान, मालमत्ता कराच्या देयकावर नाव, मोबाइल क्रमांक बरोबर आहे का, याची खातरजमा करावी. दुसरा मोबाइल क्रमांक किंवा संपर्काचा वेगळा पत्ता द्यायचा असेल, तर तो देखील देता येणार आहे.
देयके घेऊन आलेल्या महिलांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन करआकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.
मालमत्ताकराच्या देयकांचे वाटप वेगाने होण्या बरोबरच मालमत्ता करातील सर्व माहिती अद्ययावत करण्यासाठी सिद्धी उपक्रम हाती घेतला आहे. महिला हा उपक्रम अतिशय उत्तम प्रकारे यशस्वी करतील, असा विश्वास असल्यानेच हे काम महिला बचत गटांना देण्यात आल्याचे समजते. यासाठी महिलांना ओळखपत्र दिले असून प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांनी महिलांचे ओळखपत्र आणि देयके पाहूनच सोसायटीमध्ये प्रवेश द्यावा असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

Related posts

देवेंद्र फडणवीसांची प्रकृती बिघडली!!

pcnews24

करोडो मराठा जोडणारे युवा प्रवीण पिसाळ यांचे निधन

pcnews24

साधूंच्या हत्येप्रकरणी CBI चौकशी होणार‌.

pcnews24

अक्षय तृतीये निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन,डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये महापूजा,प्रवचन,होणार.

pcnews24

पुढील 15 दिवसांत ‘हे ‘ सरकार कोसळणार,संजय राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ ….

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी यांच्यातर्फे सावरकर जयंती रक्तदान करून साजरी

pcnews24

Leave a Comment