गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नाही का?
नागरिकांचा संतत्प सवाल.
भर दिवसा पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी
शहराच्या ज्या रस्त्यावर वर्दळ कमी आहे त्या रस्त्यावर सोन साखळी चोर फिरतात. त्यातही महिला एकटी दिसल्याचे पाहून गाडी जवळ घेतात. आणि महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पळ काढतात.
दिवसाढवळ्या अशा चोरीच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील हडपसर येथे महिलेसोबत घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक असून पोलिसांनी साखळी चोरांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. रस्त्यावर कुणीही नसल्याने आरडाओरड करूनही उपयोग होतांना दिसून येत नाही त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात असला तरी गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नाही का? असा संतत्प सवाल या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पुण्यातील हडपसर येथील महिले सोबत घडलेला हा प्रकार नुकताच सीसीटीव्ही मुळे समोर आल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*ट्विटर विडिओ सहआभार *
भर दिवसा पुण्यातील महादेव नगर परिसरात दिवसा ढवळ्या चैन चोरीची घटना घडली आहे. दुचाकीवर तरुण आले आणि पायी चालताना गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले अशी महिलेची तक्रार असून त्यावरुन हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला . त्या आधारावर पोलिस अधिकचा तपास करत आहे. ईस्टर्न इलेगन्स सोसायटी समोरील घटना असून संशयित आरोपी फरार आहेत.सोन साखळी चोरीच्या घटना नवीन नाहीत मात्र, भर दिवसा ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.