वाघोलीत भीषण अपघातात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा पत्नीसह मृत्यू
शेतीच्या कामासाठी दुचाकीने गावी चाललेल्या दांपत्याला डंपरची धडक बसली आणि महाराष्ट्र
पोलीस दलातून निवृत्त झालेले अशोक काळे आणि त्यांच्या पत्नी वर्षा काळे (रा कसबा पेठ)पुणे यांचा जागीच मृत्यू झाला.
दौंड तालुक्या जवळ राहूया गावात शेतीच्या कामासाठी जात होते. दुपारी एकच्या सुमारास केसनंद फाट्याजवळ भरधाव वेगातील डंपरची धडक बसली आणि या दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुणे अहमदनगर मार्गावर यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी लोणीकंद येथील पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

पिछला पद