मोबाईल हरवला किंवा चोरी झाल्यास आता काळजी नाही, शासनाने केली यासंबंधीची पोर्टल निर्मिती
आपल्या सर्वांचे दैनंदिन गरज बनलेला मोबाईल कधीतरी हरवतो किंवा चोरीला जातो अशावेळी हा महत्त्वाचा ऐवज आणि त्यातील माहितीचा गैरवापर होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. यासंबंधी सायबर पोलीस ठाणे नाशिक शहराकडून नागरिकांना विशेष सूचना देण्यात आले आहेत तसे परिपत्रक त्यांनी जारी केले आहे त्यामध्ये अशी घटना घडल्यास नागरिकांनी त्वरित काय करावे याचे उपाय सांगितले आहेत
१) जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी
२) हरवलेला/ गहाळ झालेल्या मोबाईल मधील सिम कार्ड ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड सुरु करून घ्यावे व तेच सिमकार्ड CEIR वर रेजिस्ट्रेशन करीत वापरावे.
३) https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर संपर्क साधावा.
४) Block Stolen / Lost Mobile यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी व Submit वर क्लिक करावे.
५) खालील कागदपत्रे सोबत जोडावी:- (सॉफ्टकॉपीची साईज ५००kb पेक्षा कमी असावी) | पोलीस स्टेशनला केलेली तक्रार प्रत | मोबाइल खरेदी बिल | कोणतेही शासकीय ओळखपत्र
६)यावर आपल्याला तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल.
७) हरवलेला मोबाईल Active / ON झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाइल क्रमांकावर SMS द्वारे मिळेल व सदरची माहिती पोलीस स्टेशन येथे कळवावी.