महानगरपालिकेत होणार आशा स्वयंसेविका पदांची भरती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट म्हणजेच आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण 154 जागा भरल्या जाणार आहेत यासाठी इच्छुक उमेदवारांनी 25 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 पर्यंत विविध रुग्णालयात अर्ज करावेत. या पदासाठी केवळ दहावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संबंधित लोकसंख्येमध्ये यापूर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणून काम करण्यास इच्छुक असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. यासाठी 25 ते 45 वयोगट पात्र असेल.