ब्रेकिंग न्युज
मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली येथे भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा मोठा आहे की अपघाता मध्ये ११ वाहने एकमेकावर आदळून त्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बोर घाटात एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.घाटातील तीव्र उतार आणि ट्रकचा वेग यामुळे सर्व वाहने मोठ्या प्रमाणावर आदळली.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.तरी यातील काही जखमींना खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.