तळेगाव दाभाडे नगर परिषदे कडून रविवारी ई कचरा संकलन मोहीम.
नुकत्याच झालेल्या जागतिक पृथ्वी दिना चे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व ग्रीन स्केप इको मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदे कडून रविवारी 30 रोजी ई कचरा संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे.या ई कचरा संकलन मोहिमेत नागरिकांनी त्यांच्या घरातील बंद इस्त्री फॅन टीव्ही मोबाईल चार्जर जुने टेप रेकॉर्डर इलेक्ट्रॉनिक वस्तू खेळणी सीडी प्लेयर इत्यादी वस्तू संकलन करणाऱ्या वाहनामध्ये आणून द्यावे असे आवाहन नगर परिषद कडून करण्यात आले आहे.
दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त नागरिकांकडून घरोघरी जाऊन ह्या ई कचऱ्याचे संकलन करण्यात येणार आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या या उपक्रमा साठी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, मयूर मिसाळ, तुकाराम मोरमारे ,शहर समन्वयक गीतांजली होनमने तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले उपाध्यक्ष शाहीन शेख सेक्रेटरी शेखर शेंडे, प्रकल्प प्रमुख प्रशांत ताये,सह प्रकल्प प्रमुख प्रसाद बांदगुडे, सदस्य रेश्मा फडतरे यांचा विशेष सहभाग या मोहिमेत असणार आहे.