पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची अचानक ‘सुखद’ भेट
अनेक सरकारी अधिकारी हे आपल्या कार्यालयातच भेटणे योग्य समजतात तर बरेच कमी अधिकारी असे असतात की जे जनतेत उतरून त्यांची विचारपूस करत,त्यांच्या विविध बाजूंना,समस्यांना समजून घेतात..याच संदर्भातला एक प्रकार नुकताच बघायला मिळाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंह यांनी दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी दुर्गा टेकडी,निगडी येथे अचानक भेट दिली. मॉर्निंग वॉक साठी आलेल्या विविध नागरिकांशी चर्चा केल्या, काही प्रशासनाच्या बाजू त्यांनी मांडल्या व त्या बरोबरीने लोकांच्या बाजू देखील समजून घेतल्या. आज असे सरकारी अधिकारी बघायला मिळणे बरेचसे कमी झाले आहे.
प्रशासनाने नेहमीच जनतेबरोबर असा संवाद ठेवला , एक चांगले प्रशासक म्हणून आपले कर्तव्य बजावले तर शहरा चा विकासाला याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास नागरीकांनी मांडला. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या या भेटीने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.